आईपण अनुभवताना ...
5655
9
3
|   Jun 19, 2017
आईपण अनुभवताना ...

   आज सकाळपासूनच मन उदास उदास होते , शरण्या च्या पायाच  प्लास्टर काढल्यानन्तरसुधा तिचे न चालण्यामुळे थोडेसे दडपण आल.  सकाळपासून तिचे जुने फोटो , वीडियो पाहून अजूनच मागची उजळणी व्हायला लागली

 

   १५ नोव्हेंबर २०१५, सकाळी ८ वाजता, "तुम्हाला मुलगी झालीय, मुलीची तब्ब्येत एकदम छान आहे "डॉक्टरांचे शब्द कानावर पडताच आनंद गगनात मावेनासा झाला . आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आज अनुभवायला मिळाल्याची भावना निर्माण झाली. दवाखान्ह्यातले ते चार दिवस संपवून आम्ही माय लेकी घरी परतलो . आमचं घरामध्ये छान स्वागत झालं. घरात अजून एक मेंबर ऍड झाल्यामुळे सगळ वातावरण आनंदमयी होते.  मनावर दडपण तर होतेच कि आपण कसा सांभाळू इतक्या छोट्या बाळाला? पण पाण्यात पडलं कि पोहता हे येतेच अस म्हणतात ते खरंच !!बघता बघता ४ महिने कसे गेले कळलं पण नाही , रोजचा दिवस पिल्लुच्या नवीन हालचाली पाहण्यात न त्याच कौतुक करण्यात कसा निघून जायचा कळायचंसुद्धा नाही.

पुढच्या एका महिन्यात नोकरी वर  रुजू  व्हायचय  हे  लक्ष्यात  आलं कि  परत  टेन्शन  यायचं , बरेचदा  विचार केला  "जाऊदे  सोडून  देऊ नोकरी , काय करायचं इतके पैसे कमवून, आपण आपल्या मुलांना वेळ नाही देऊ  शकत तर अशा नोकरीचा काय फायदा ?" पण नोकरी सोडून घरी  बसणं इतक सोप्पं  नव्हतं.

 

एकच पर्याय होता, शरण्या  ला आपल्याशिवाय थोडा वेळ राहायची  सवय लावणं. १ महिना  होता न त्यात बरंच काही करू शकत होते . शेवटी  मनावर  घेतलं कि सगळ्या  गोष्टी पूर्ण होतात. तिला वरच खाऊ घालणं, २ ३ तास घरातच तिच्यापासून लपून बसणं, अगदी कसोशीने केले. आणि मुख्य म्हणजे माझ्या पिल्लूने ते सगळे पटापट आत्मसात पण करून घेतले. तिच्या शहाणपणाचं मला फारच कौतुक वाटलं. दीड महिन्याने  तो दिवस आलाच , नोकरी वर रुजू होण्याचा. सकाळपासूनच मन परत अस्वस्थ झाले , कोणाला न काय बोलू काही समजत नव्हते. तशीच आवराआवर करून ऑफिस ला जाण्यासाठी तयार झाले.

 

जशी लिफ्ट मध्ये घुसले, नवऱ्याने पाठीवर हात ठेवला न म्हणाला ," काळजी  नको करू, आपल पिल्लू फार शहाणं आहे ,छान राहील " .  सकाळपासून जो आवंढा आवरत होते तो आपोआपच मोकळा झाला. डोळ्यातलं पाणी पुसत तशीच रिक्षात बसले न ऑफिस साठी निघाले. मनाची इतकी कालवाकालव पहिले कधीच नाही झाली आणि कदाचित हि माझी घुसमट नवऱ्याच्या पण लक्ष्यात आली असावी. हि अशी जी काहि माझी परत ऑफिस ची सुरुवात झाली ती  आजपण तशीच चालू आहे. आता माझं पिल्लू दीड  वर्षांचं आहे आणि मला आजपण वाटते, कसं या देवाने इतका शहाणपण दिलय  माझ्या लेकराला .....

 

आमच्या घरी स्वयंपाकासाठी एक काकू यायच्या , त्यांची घरी येण्याची वेळ संध्याकाळची  ५ वाजता . त्यांनी घराची बेल वाजवताच, माझी पिन्नु मम्मा मम्मा  म्हणत धावत दरवाज्याकडे जायची, डोळ्यात एक चमक आणि चेहऱ्यावर हसू घेऊन . पण त्यानंतर अपेक्षित व्यक्ती ना दिसल्याने, तिचा चेहरा पाहून, आजोबांचं मन सुद्धा कासावीस होऊन जायचं  . तिचा असा हा कार्यक्रम २ ३ वेळेस तिच्या आजोबांकडून मला कळाला. तेव्हाच मी ठरवलं, काही झालं तरी ऑफिस मधून लवकर निघायचं, हवं तर आपल्याला परत घरून काम करता येतेच. पण लेकराचं मन उदास नको व्हायला. ऑफिस मधे ५ वाजताच माझी घरी निघण्याची घाई सुरु होते. एव्हाना मला वाटते प्र���्येक आईला अशीच घाई होत असावी. कारण ऑफिस मधले टी ब्रेक्स, टाळणाऱ्या किती तरी मॉम्स पाहिल्यात मी, लवकर काम संपवून घरी लवकर जाता यावं एवढाच तो हेतु  !!!

 

घरी पोहचताच शरण्या च गळ्यात पडणं, मग तिला काही नकला करून दाखवणं आणि खुदुखुदू हसवणं, हा माझा नित्याचा प्रोग्रॅम. हा प्रोग्रॅम संपताच काही वेळात जेवण आणि परत बाबांच्या येण्याची आणि गमती करून दाखवण्याची वेळ. आणि परत खुदुखुदू हसणं. अगदी रोजचा कार्यक्रम ठरला होता. ऑफिस मधून कितीही  दमून  आले तरी तिचे बाबा अगदी दरवाज्यातच तिला कडेवर घेऊन स्वतःची इंटेरटैनिंग ऍक्ट चालू करतात.  मागच्या १का महिन्यात या कार्यक्रमात थोडे अडथळे तर आलेच पण आशा आहे परत लवकरच सगळे पूर्ववत होईल.

 

ह्या सगळ्या जुन्या आठवणींना  गोंजारतानाच आजीचा  आवाज कानावर पडला , "बाळा उभा राहिला, बाळा उभा राहिला !! कोणी नाही पाहिला, कोणी नाही पाहिला". धावत जाऊन पाहिलं, तर शरण्या उभी !!!! तिला पाहताच जीव भांड्यात पडला. आता लवकरच ती चालेल अशी अपेक्षा आहे :)

Read More

This article was posted in the below categories. Follow them to read similar posts.
LEAVE A COMMENT
Enter Your Email Address to Receive our Most Popular Blog of the Day