अध्ययन अक्षमता..... अर्थात learning disability
2760
9
|   Jun 06, 2017
अध्ययन अक्षमता..... अर्थात learning disability

हा मुलगा म्हणजे ना...... ढ आहे ढ, काहीच कसं येत नाही ह्याला????

अरे बापरे हे बघा हिने काय लिहून ठेवलंय ते...... असं का विचित्र लिहिते हि.......

किती वेळा सांगितल, तरी ह्याच अक्षर काही सुधारत नाही, किती spelling mistakes करतो  हा...

अशी आणि अशा प्रकारची बरीच वाक्य आपल्याला ऐकायला मिळतात. शाळेमध्ये शिक्षकाकडून, private tuition मध्ये  टीचर कडून, प्रत्येकाकडून ऐकायला मिळत. पण हे नेमकं का होतंय? ह्याचा आपण विचार केला का?? किंवा करतो का??

साधारण मूल लिहायला, वाचायला शिकलं कि त्याला सगळ अगदी व्यवस्थित आलंच पाहिजे अशी किमान अपेक्षा पालक आणि शिक्षकांची असते आणि तसं नाही झाल तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने, धाक दाखवून, ओरडून, कधी कधी मारून सुद्धा त्यांच्याकडून अभ्यास करून घेतो. बऱ्याच पालकांची तक्रार असते कि, हा किंवा हि बाकीच्या गोष्टी तर व्यवस्थित करतो किंवा करते, computer, mobile अगदी सफाईने हाताळतात. ते कसं जमत बुआ, मग अभ्यास का नाही जमत???? ह्याला कारण म्हणजे या विषयाबद्दलची कमी असलेली जागरूकता. आमीर खान चा तारे जमीन पर एवढा गाजलेला असूनही आपल्याकडे अजूनही learning disability म्हणजेच अध्ययन अक्षमता अजून तितक्या सहजतेने स्वीकारली जात नाही. खालील काही लक्षणे अध्ययन अक्षमता असणाऱ्या मुलांमध्ये आढळतात.

१ विकासात्मक टप्पे (developmental milestones) म्हणजेच चालणे, बोलणे यांना विलंब होतो.

२ लिखाणात खूप चुका असतात, हस्ताक्षर (handwriting) खूप खराब असते.

३ लिखाणाचा खूप कंटाळा करतात, काहीतरी कारण देऊन ते टाळतात.

४ तोंडी प्रश्न विचारले तर पटापट उत्तरं देतात. पण तेच लिहायला सांगितलं तर पंचायत होते किवा विसरतात.

५ अक्षरे उलटसुलट लिहितात. b ला d आणि d ला b. p ला q, w ला m.

६ वाचनातही भरपूर चुका आढळतात जसं कि, वाचता वाचता शब्द न वाचणे, वाचता वाचता मधेच अडखळण, खूप वेळ मधे वाचताना थांबणे.

७ पुन्हा पुन्हा तीच ओळ किवा तोच शब्द वाचणे.

८ कित्येकवेळा वाचताना चुकीचं वाचणे म्हणजे the ला they किवा them वाचणे.

९ एक एक अक्षर वाचणे, म्हणजे many M-A-N-Y.

१० गणितात चिन्हामध्ये गडबड करणे.

११ डावी बाजू (left) उजवी बाजू (right) मध्ये  गडबडणे.

१२ खूप instructions एकदाच दिल्या तर गोंधळून जाणं आणि त्या नीट follow न करणे.

हि आणि अशी बरीचशी लक्षणे मुलांमध्ये आढळून येतात. वरवर पाहता हि लक्षणे खूप साधी वाटतात पण त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचं आहे.

मुळात ह्या मुलांचा performance IQ (बुध्यांक) हा verbal IQ पेक्षा जास्त असतो. अध्ययन अक्षमता हा ब्रेन प्रोसेसिंग प्रोब्लेम आहे. आपल्या मेंदू मध्ये प्रोसेसिंग युनिट आहे. अगदी कॉम्पुटर मध्ये असत तसं. यात आपण आपल्याला जी माहिती (information) मिळते ती साठवतो, लक्षात ठेवतो. जे महत्वाचं नाही ते विसरतो (delete) करतो. एखादी माहिती ज्या वेळी हवी आहे ती त्यावेळी आठवतो. असं हे ब्रेन प्रोसेसिंग युनिट काम करते. पण एखाद्याला जर अध्ययन अक्षमता असेल तर ह्या प्रोसेसिंग युनिट मध्येच गडबड असते. ती माहिती व्यवस्थित प्रोसेस होत नाही.

कालांतराने मुलांमध्ये न्यूनगंड सुद्धा तयार होतो, चिडचिडी होतात. अभ्यास नको म्हणतात. कुणाचही ऐकत नाहीत. त्यांना समजून घेणे खूप गरजेचं आहे. अध्ययन अक्षमतेची लक्षणे दिसल्यास त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

 

प्राची हडवळे

Clinical psychologist

Read More

This article was posted in the below categories. Follow them to read similar posts.
LEAVE A COMMENT
Enter Your Email Address to Receive our Most Popular Blog of the Day