आई बाबांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा
35784
38
1756
|   Feb 27, 2017
आई बाबांच्या अपेक्षा आणि मुलांच्या इच्छा

काही दिवसांपूर्वी मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला गेले होते. तिला माझ्या मुलीएवढाच दोन वर्षाचा, अतिशय हुशार आणि आक्टिव मुलगा आहे. पण माझी मैत्रीण म्हणजे आजची फारच अप टू डेट ( सर्व परीने जाणकार वगेरे) आई आहे . आपला मुलगा कसा सगळ्यांपेक्षा स्पर्धेत पुढे आणि यशस्वी असायला हवा याची तिला सदैव काळजी असते. आता तो फक्त दोन वर्षाचा आहे म्हणून काय झाले ? त्याला कसे सगळे बोलायला, करायला, खेळायला, वागायला, समजले पाहिजे या कडे माझ्या या मैत्रिणीची सगळी भिस्त. त्यामुळे तिच्या मुलाला अजुन स्पष्ट आणि न अडखळता बोलता येत नाही याची तिला फार खंत वाटते.

साधारणपणे असे पाहण्यात आले आहे की मुली ह्या मुलांनपेक्षा लौकर बोलायला लागतात. शिवाय इतरही काही कामे जसेकि रंगांची ओळख लोकांची ओळख ई. हे मुलींना लगेच कळायला लागते. ह्या कॅल्क्युलेशन प्रमाणे माझ्या मैत्रिणीच्या मुलाची वाढ अगदी नॉर्मल वेगाने चालू होती. फक्त बोलणे सोडले तर इतर सगळ्या गोष्टीमधे तो चांगलाच वस्ताद होता. आणि मला वाटते हे तिला समजत असूनही तिला मान्य करायचे नव्हते.

याच्यावर उपाय म्हणजे तिने आपल्या मुलाला इंग्लीश गाणे इंग्लीश शब्द इंग्लीश कविता शिकवायला सुरूवात केली होती. आता गंमत अशी होती की माझी मैत्रीण आणि तिचा नवरा हे एकमेकांशी घरी अगदी शुद्ध मराठीत बोलायचे आणि आपल्या मुलाशी बोलताना मात्र इंग्लीश ??? आधीच गोंढळलेला तो पिल्लू दोन वेगवेगळ्या भाषा ऐकून अजुन बावरून गेला.

त्याच्या उलट माझी मुलगी ही मुळातच फार बडबडी आहे. आमच्या घरी आम्ही एकूण सहा लोक - आम्ही दोघे, आई बाबा, माझी मुलगी आणि तिचा काका. त्यामुळे रोज इतर मुलांनपेक्षा थोडे जास्तच शब्द तिच्या कानावर पडतात. आणि आम्ही सगळेच एकमेकांशी मराठीत बोलत असल्यामुळे माझ्या मुलीची भाषेची समाज फार उत्तम आहे.

असो, तर माझ्या मैत्रिणी कडे आमच्या चिऊताईची अखंड बडबड पाहून माझी मैत्रिण अवकाच झाली. पण मला असे जाणवले की तिला निराशा जास्त झाली आहे. कारण तिच्या मुलापेक्षा माझी मुलगी बोलण्याच्या डिपार्टमेंट मधे सराईत होती. आम्ही अगदी बाल मैत्रिणी असलो तरीही ही आपल्या मुलांमधे तुलना करते आहे हे जाणवल्यावर मला वाईट वाटले. पण मला तिची मानसिक अवस्था जास्त घातक वाटली. कशीतरी मी तिची तेव्हा समजूत काढली आणि आम्ही घरी परतलो.

पण एक विचार माझ्या मनात सतत येत राहिला. माझ्या मैत्रिणी सारख्या अश्या कित्येक आया असतील ज्या आपल्या मुलांकडून इतक्या लहानपणापासून खूप अपेक्षा करतात ? प्रत्येकच आईला आपला मुलगा/ मुलगी फार हुशार असावा असे वाटत असते पण त्या अपेक्षेचा जेव्हा अट्टाहास होतो तेव्हा त्याचा मुलांनाच त्रास होतो ह्याचा विचार ती आई का करत नाही ?? जसे की "तारे जमीन पर" या चित्रपटात आमीर खान म्हणतो की प्रत्येक मुलाचा एक स्वभाव असतो, एक गती असते, त्या प्रमाणे तो आपल्या आयुष्यात शिकत असतो आणि प्रगती करतो. पण आईवडिलांनी आपले स्वप्न जर मुलांवर लादले तर मुलांवर त्यांचा वाईट परिणाम होतो. ते अपेक्षाच्या ओझ्याखाली दबून जातात आणि एकाकी होतात.

खर म्हणजे आजची पिढी ही फार ब्राइट आहे आणि बर्‍याच गोष्टी आपली मुले आपोआपच शिकतात. त्यांना गोष्टी शिकवण्यापेक्षा आई वडील जर त्यांना जसे मुलांनी वागावे असे वाटते तसे ते स्वतः वागले तरी आजची मुले अगदी सहजपणे त्याचे अनुकरण करतात. अशी शिकवण मग मुले कायम लक्षात ठेवतात. मुलांना चांगले जगणे कळते आणि ते स्वाभाविकच मग यशस्वी होतात.

आणि तरीही मी तर असे म्हणेल की यश म्हणजे नक्की काय ?? आपल्या मुलांच्या आपल्या पेक्षा यशाच्या वेगळ्या व्याख्या कल्पना असु शकतातच. तर मग त्यांनी त्यांचे आयुष्य त्यांच्या कल्पनेतले यश मिळवण्यात का घलवू नये ??

मी आता ठरवले आहे, पुढच्या वेळेस माझ्या मैत्रिणीला भेटली की मी तिला परत एकदा "तारे जमीन पर दाखवणार आहे".

 

 

 

 

 

Read More

This article was posted in the below categories. Follow them to read similar posts.
LEAVE A COMMENT
Enter Your Email Address to Receive our Most Popular Blog of the Day